अमळनेर - Amalner

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या बघता अमळनेर नगरपालिका हद्दीत तीन दिवसांचा बंद पाळण्यात येणार असल्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांनी काढला आहे.

प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी काढलेल्या आदेशानुसार दि.१९ ते २१ मार्च दरम्यान अमळनेर नगरपालिका हद्दीत तीन दिवसांचा बंद पाळण्यात येणार आहे. यात सर्व बाजारपेठ, आठवडी बाजार बंद, किराणा दुकाने व इतर सर्व दुकाने बंद राहतील. तसेच किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी-विक्री केंद्रही बंद राहतील.

शैक्षणिक संस्था, शाळा महाविद्यालय खाजगी कार्यालये बंद, हॉटेल, रेस्टॉरंट (होम डिलीव्हरी, पार्सल वगळता) बंद राहतील. सभा, भेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतीक कार्यक्रम बंद, शॉपींग मॉल्स, मार्केट, शॉप, स्पा, सलुन, लिकर शॉप बंद, गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद त्याचप्रमाणे पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.