ब्रूक कंपनीचे रेमडीसीवर विक्रीला परवानगी नाही

जनसेवेच्या नावाने माजी आ शिरिष चौधरींनी केला धंदा
ब्रूक कंपनीचे रेमडीसीवर विक्रीला परवानगी नाही
आ अनिल पाटील

अमळनेर - Amalner - प्रतिनिधी :

गुजराथ राज्यातील ब्रूक कंपनीचे रेमडीसीवर इंजेक्शनला महाराष्ट्रात काय भारतातही कूठेच विक्री करण्याची कूठलीही परवानगी नसतांना जनसेवेच्या नावाने एक्सपोर्टचे हे इंजेक्शन आपल्या अमळनेर शहरात दूप्पट तिप्पट नफा कमवून विक्री करून धंदा केला या इंजेक्शन मूळे अनेकांना त्रास झाले असून त्या काळात शहरात मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप करीत जनतेच्या जिवाशी खेळण्याचे पातक माजी आमदार शिरिष चौधरी यांनी केले असल्याचे मत आ अनिल पाटील यांनी आज त्यांचे निवासस्थानी आयोजीत पत्रकार परिषदेत केले .

या गैरप्रकाराविरूध्द आपण सोमवार पासून पाठपूरावा करून दोषी व्यक्तींवर गून्हे दाखल करण्यास भाग पाडू असेही त्यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणाऱ्या या ब्रूक कंपनिच्या रेमडेसीवरचे पाळेमूळे अमळनेरात असून त्यावर अनेक राजकिय खलबते झाली १० दिवसांपूर्वी माजी आ शिरिष चौधरी यांनी आपल्या निवासस्थानी सूमारे शेकडो इंजेक्शन १५०० ते १७०० रूपयात विक्री करित खूलेआम वाटप केले.

या प्रकरणी आ अनिल पाटील यांनी तक्रार केली होती हि बाब राज्यस्तरावर रा कॉ चे प्रवक्ते नवाब मलीक यांनी देखील या प्रकरणी गंभिर आरोप करित तिव्र आक्षेप घेतला होता.

परवा माजी आमदार शिरिष चौधरी यांनी आ पाटील यांचेवर आगपाखड करित १०० गून्हे दाखल झाले तरि मी हा गून्हा पून्हा पून्हा करेन असे म्हटले होते त्यावर आ अनिल पाटील यांनी प्रतिऊत्तर देवून आपली बाजू मांडून यातील काय सत्यता आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली .

२ नंबरचा धंदा करणाऱ्यांचा विरोधच

मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून नक्कीच काम करेन मात्र त्यांनी १ नंबरचा धंदा करावा दारूच्या बाटलीत पाणी टाकून लॉकडाऊनच्या काळात धंदा करणाऱ्या एका बिल्टीवर ३ दारूच्या गाड्या पास करणाऱ्यांच्या खांद्याला खांदा कसा लावू असा सवाल करित त्यांचे अशा बोगस गिरि विरूध्द आपण लाख वेळा विरोध घेवू हे ब्रूक कंपनिचे रेमडेसीवर विक्रीला एफडीए व केंद्राची परवानगी आणा आपण विकत घेवून जनतेला फूकट देवू तिच खरि जनसेवा राहिल परदेशातील एक्सपोर्ट करणे केंद्र शासनाने थांबविल्या मूळे कोट्यावधी रूपयांचा माल पडून होता तो आपल्या हॉटेल मध्ये साठवून जमसेवेच्या नावाने धंदा केला आहे .

त्याला मी विरोध केल्यानेच धंदा बंद पडला म्हणून शिरिष चौधरींचा जळफळाट झाल्याचे आ पाटील यांनी सांगीतले या ईंजक्शन मध्ये असलेले ड्रग आपल्या भारतीय नागरीकांना सूट होत नाही म्हणूनच एफडीएची याला भारतात विक्री करण्याची बंदी असल्याचे त्यानी म्हटले आहे .

त्यांचे कडे जर लायसन्स होते तर पहिल्या लाटेत का आणले नाही ? आत्ताच का? चांगले काम असेल तर १०० टक्के सोबत राहू मात्र अशा कूठल्याही बोगस कामात २०० टक्के विरोध राहिल मी पहिल्या लाटेत आमदार निधीतून ५० लाख रूपयांचे वैद्यकीय साहित्य दिली ती आजही पूरत आहेत खंडणी गोळा करणे ज्याचे काम असते तोच आरोप करतो असे सांगून माजी आमदार चौधरींनी केलेल्या आरोपांवर त्यांनी घणाघाती शब्दात प्रति आरोप करित पलटवार केला
डब्ल्यू एच ओ च्या गाईडलाईन नूसार ज्या कोरोना पेशंटचा स्कोर १० पेक्षा जास्त आहे त्या़चेसाठीच हे ईंजक्शन वापरावे असे असतांना सर्रासपणे याचा वापर केला जातो त्यामूळे अनेक पेशंटांना साईड ईफेक्ट होवून काही अवयव निकामी होत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे माझे वैद्यकीय व्यवसायातील कोरोना योद्यांना विनंती आहे कि रेमडीसीवर ईंजक्शनचा सर्रास वापर थांबवावा येत्या २ दिवसात सर्वत्र हे ईंजक्शन आता ऊपलब्ध होतील असे अनिल पाटील यांनी सांगीतले

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सूरू असलेल्या कोरोना चाचणी कँप मूळे रूग्ण सापडून त्यांचेवर वेळीच ऊपचार व विलगीकरण होत असल्याने गेल्या ३ दिवसातील कोरोना आकडेवारी घटली आहे हि बाब समाधान कारक आहे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com