चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

थर्टीफस्टच्या पूर्वसध्येला मटणावर ताव मारण्यासाठी शहरातील जाकीरहूसेन सोसायटीतून एकाने घराबाहेर बाधलेल्या बोकडाची चोरी करुन, तो कापण्यासाठी दिला. मालक बोकड्याचा शोध घेत नाही, तोपर्यत बोकड्या कापण्यात आला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला एका विरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील जाकीरहूसेन सोसायटीत रहाणारे जुबेरखान अकबरखान मुल्ला यांच्या मालकीचा आठ हजार रुपये किंमतीचा बोकड त्याच्या घराबाहेर बांधलेला असतांना भैय्या लक्ष्मण चौधरी रा.हरीओम नगर चाळीसगांव याने तो चोरुन नेवून नागदरोडवर कापण्यासाठी दिला, असता लागलीच बोकड चोरीनंतर शोधासाठी आलेल्या जुबेरखान यांना तो सदर ठिकाणी कापलेल्या स्थितीत आढळून आला.

दरम्यान आरोपी भैय्या चौधरी याला पोलिसांनी अटक करुन बोलते केले असता, थर्टीफस्टसाठी लहान मुलांनी माझाकडे मटणाची मागणी केली होती. त्यामुळेच मी बोकड्याची चोरी करुन, तो कापला यामागे फक्त मुलांना मटन खावू घालुन त्यांचा आर्शिवाद घेणे हाच उद्देश असल्याचे त्यांने सांगताच, पोलिसांना देखील हसू आवरले नसल्याची माहिती मिळाली.

याप्रकरणी शहर पोलीसांत स्टेशनला जुबेरखान अकबरखान मुल्ला यांच्या फिर्यादीवरुन भैय्या लक्ष्मण चौधरी याच्या विरोधात कलम ३७९/४२९ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.भगवान उमाळे करीत आहेत.