जेवणाच्या दर्जावरुन सत्ताधारी- विरोधकांमध्ये कलगीतुरा

जेवणाच्या दर्जावरुन सत्ताधारी- विरोधकांमध्ये कलगीतुरा

जळगाव-

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर महानगरपालिकेचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित केले आहे. यात कोरोना बाधित रुग्णांना दिले जाणार्‍या जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्यावरुन सोमवारी कैलास सोनवणे यांनी त्या ठिकाणी जावून अधिकार्‍यांना धारेवर धरले. तर दुसर्‍या दिवशी महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट देवून रुग्णांना दिल्या जाणार्‍या जेवणाचा दर्जा चांगला असल्याचा दावा केला. त्यामुळे आता, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरला भेट देत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक किशोर बाविस्कर, चेतन सनकत, कुंदन काळे, डॉ.विजय घोलप आदी उपस्थित होते.


महापौर-उपमहापौरांनी घेतली जेवणाची चव
मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने नगरसेवक कैलास सोनवणे यांनी त्या ठिकाणी जावून अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट देवून रुग्णांशी संवाद साधला. तसेच जेवणाबाबत काही तक्रारी आहेत का? अशी विचारणा केली असता, रुग्णांसह अधिकार्‍यांनी कुठलीही तक्रार नसल्याचा खुलासा केला. त्यानंतर रुग्णांना दिल्या जाणार्‍या जेवणाची चव महापौर आणि उपमहापौरांनी घेतली आणि दर्जा उत्तम असल्याचा खुलासा देखील केला. त्यामुळे आता, जेवणाच्या दर्जावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.


तक्रारी असल्यास थेट आम्हाला कळवा
रुग्णांना मिळणार्‍या आरोग्य सुविधा किंवा जेवणाबाबत काही तक्रारी असल्यास कोविड केअरमधील संबंधीत डॉक्टर्स्, समन्वयक किंवा थेट आम्हाला कळवा असे आवाहन महापौर आणि उपमहापौर यांनी केले. दरम्यान, रुग्णांच्या काळी तक्रारी असल्यास त्या तात्काळ मार्गी लावण्याबाबत अधिकार्‍यांना सूचना केली.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरला भेट देत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक किशोर बाविस्कर, चेतन सनकत, कुंदन काळे, डॉ.विजय घोलप आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com