पारोळा - प्रतिनिधी Jalgaon

कोरोना चा वाढता प्रभाव पाहता पालिकेत नुकतीच प्रशासन व व्यापार्यांची बैठक होऊन आठवड्यातून सोमवारी जनता कर्फ्यू पाडला जावा असे सर्वानुमते ठरल्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता भाजीपाला सह कृषी केंद्र व महामार्गालगत ची सर्व दुकाने बंद असल्याने सोमवार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसून येत असून याबाबत प्रशासनाकडून नागरिकांसह व्यापारी वर्गाचे कौतुक होत आहे.

जिल्ह्यासह इतर तालुक्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसाची मुदत देत "मी जबाबदार" मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत तसेच कोरोणाचा नवा प्रकार संसर्गजन्य करू शकल्याच्या इशारा वैद्यकीय सूत्रांनी दिल्याने सर्वत्र अलर्ट राहण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आले आहेत कोरोणाची साखळी तोडण्यासाठी गर्दी कमी होणे गरजेचे असल्याने आठवड्यातून एक दिवस जनता कर्फ्यू काढण्यात यावा असे पालिकेकडून नगराध्यक्ष करण पवार व मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी व्यापारी महासंघ सह व्यापारी बांधवांना आव्हान केले होते त्या पार्श्वभूमीवर आज सर्वच दुकाने बंद ठेवून सोमवार बंद यशस्वी झाला आहे.

यावेळी पालिका कर्मचारी सह पोलिस प्रशासन व महसूल विभाग यांनी करडी नजर ठेवत गर्दी होणार नाही याबाबत लक्ष केंद्रित केले आहे.

महामार्गावर शुकशुकाट

कोरोना च्या पहिल्या लाटेत दर सोमवारी जनता कर्फ्यूत नगर पालिका चौकातील दुकाने सह बाजारपेठतील दुकाने बंदमध्ये सहभागी होत होती तर महामार्गावरील दुकाने सुरू राहत असल्याने यावेळी व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त केली जात होती मात्र आता सोमवार बंदच्या हाकेला महामार्गालगत ची दुकाने बंद असल्याने महामार्ग वर शुकशुकाट दिसून येत होता, बँक परिसर, कोर्ट आवार, पंचायत समिती याच ठिकाणी लोकांची तुरळक गर्दी दिसून येत होती.

लग्न समारंभ वाल्यांच्या मनात धडकी

पारोळा पोलीस ठाण्यात आज पारोळा पोलिसांचे इन्स्पेक्शन असल्याने आज एस पी मुंडे हे सकाळपासून पारोळा पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते त्यामुळे शहरासह तालुक्यातील गावांमध्ये असलेले विवाह सोहळे लग्न वाल्यांच्या मनात धडकी भरली होती तर अनेकांनी मास्क,सॅनिटायझरचा वापर करताना दिसून आलेत.