जामनेरच्या ‘त्या’ संकुलप्रकरणी दुसर्‍या दिवशीही चौकशी

तक्रारदार ॲड. विजय पाटील यांनी घेतली चौकशी समितीची भेट
जामनेरच्या ‘त्या’ संकुलप्रकरणी दुसर्‍या दिवशीही चौकशी

जळगाव- Jalgaon

जामनेर येथे बीओटी तत्वावर उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीकडून जिल्हा परिषद येथे चौकशी केली जात आहे. दरम्यान, यातील तक्रारदार ऍड. विजय भास्कर पाटील यांनी शुक्रवारी दुपारी चौकशी समितीची भेट घेतली. महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.

जामनेर येथील व्यापारी संकुलाच्या गैरव्यवहाराबाबत केलेल्या तक्रारीनुसार शासनाने त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली असून, या समितीत नाशिक विभागाचे सहा. आयुक्त तथा समितीचे अध्यक्ष मनिष सांगळे, राजन पाटील, लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांचा समावेश आहे. चौकशीसाठी समिती गुरुवारी दाखल झाली असून, या समितीने शुक्रवारीदेखील दिवसभर महत्वाच्या कागदपत्रांची पाहणी केली. या प्रकरणात अनेक तांत्रिक मुद्दे तपासल्यानंतर त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.
तक्रारदारांनी घेतली भेट.

ॲड. विजय पाटील यांनी केलेली तक्रार आणि त्या अनुषंगाने जि.प.तील महत्वाच्या कागदपत्रांचे समितीकडून अवलोकन केले जात आहे. याप्रकरणी तक्रादार ऍड. विजय पाटील यांच्यासह जि.प.सदस्य रवी पाटील, रवी देशमुख, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, रवींद्र शिंदे, अशोक पाटील, सुहास चौधरी यांनी शुक्रवारी दुपारी जि.प.त जावून समितीची भेट घेतली. तसेच जनहिताचे काम असल्यामुळ निपक्षपणे चौकशी करावी अशी मागणी करत, याप्रकरणात सहकार्य करण्याची ॲड.पाटील यांनी तयारी दर्शविली.

१५ दिवसानंतर पुन्हा येणार समिती
जामनेरच्या व्यापारी संकुलाबाबतच्या गैरव्यवहार प्रकरणी समितीकडून चौकशी केली जात आहे. त्या अनुषंगाने माहिती आणि कागदपत्रांचे अवलोकन करण्यात येत असून, पुन्हा १५ दिवसानंतर ही समिती चौकशीसाठी येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांकडून मिळाली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com