आत्महत्या
आत्महत्या

धार येथील प्रौढाची आत्महत्या

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

घराच्या पत्राच्या वरंडीवरील बांधकामाचे साहित्य न उचलण्याच्या कारणावरुन धार (ता.धरणगाव) येथील मारहाणीच्या घटनेतील एका प्रौढाने दि.१ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विषप्राशन करुन आत्महत्या केली.

या प्रौढास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली.

याबाबत उषाबाई संभाजी साळुंखे यांनी फिर्याद दिली. आरोपींनी घराच्या पत्राच्या वरंडीवर बांधकामाचे साहित्य पडले होते, ते उचलले नाही, या कारणावरुन वाद झाला. यात उषाबाई साळुंखे, त्यांचे पती व मुलांना शिविगाळ व मारहाण करण्यात आली.

या घटनेबाबत २५ जुलै रोजी पाळधी दूरक्षेत्रला उषाबाई साळुंखे यांनी तक्रार दिली. त्यावरुन पाळधी दूरक्षेत्रला अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. परंतु, आरोपींच्या त्रासाला कंटाळून संभाजी सुकदेव साळुंखे यांनी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता विषप्राशन करुन आत्महत्या केली.

प्रौढास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कैलास मंगा साळवे, सरलाबाई कैलास साळवे, शीतल कैलास साळवे, पूजा कैलास साळवे, पूनम कैलास साळवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातील कैलास मंगा साळवे यास पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एच.एल.गायकवाड करीत आहेत.

Last updated

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com