कानसवाडा येथे अपघातात दुचाकीस्वार प्रौढाचा मृत्यू

वाळूचे ट्रॅक्टरने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी आदळली
कानसवाडा येथे अपघातात दुचाकीस्वार प्रौढाचा मृत्यू

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

रस्त्यावरुन जात असलेल्या वाळुने (sand) भरलेल्या ट्रॅक्टरचालकाने (tractor driver) अचानक ब्रेक (Break) लावल्यामुळे ट्रॅक्टर जागीच थांबले. अचानक थांबलेल्या ट्रॅक्टरवर मागून येणारी दुचाकी धडकून दुचाकीस्वार संजय रामचंद्र सोनवणे (Sanjay Ramchandra Sonawane) (वय 49, रा. कानसवाडा, ता. जळगाव) यांचा मृत्यू (Death) झाला. रविवारी रात्री 7.30 वाजता तलुक्यातील कानसवाडा येथे हा अपघात झाला.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार,संजय सोनवणे हे शेतकरी होते. रविवारी रात्री 7.30 वाजता सोनवणे हे दुचाकीने घरी जात होते. यावेळी कानसवाडा शिवारात रस्त्यावरुन एक ट्रॅक्टर जात होते. या ट्रॅक्टरचालकाने अचानक ब्रेक लावला. अचानकचा प्रकार लक्षात न आल्याने संजय सोनवणे यांची दुचाकी थेट ट्रॅक्टरवर आदळली. यात दुचाकीस्वार सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री 8.30 वाजता सोनवणे यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता.

वाळूचे ट्रॅक्टर रिकामे करुन पुन्हा घटनास्थळी

अपघातानंतर ट्रॅक्टर घेवून चालक पसार झाला. व वाळुने भरलेले ट्रॅक्टर रिकामे करुन त्याने पुन्हा घटनास्थळी आणुन उभे केल्याचा प्रकारही यावेळी घडला. ट्रॅक्टरचालकाच्या चुकीमुळे सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीय, नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी ट्रॅक्टरचालकाच्या विरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहितीही सोनवणे यांच्या नातेवाईकांनी दिली. मृत सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com