विजेचा धक्का लागल्याने प्रौढाचा मृत्यू
जळगाव

विजेचा धक्का लागल्याने प्रौढाचा मृत्यू

हरीविठ्ठल नगरातील घटना

Ramsing Pardeshi

जळगाव । Jalgaon

पिण्याचे पाणी भरत असतांना विद्युतपंपामुळे विजेचा जोरदार झटका बसल्याने एका 56 वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना हरीविठ्ठल नगरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हरीविठ्ठल नगरातील जुना आठवडे बाजार परिसरात प्रकाश रामधन पवार (वय-56) हे आपल्या कुटुंबासह राहतात. हरिविठ्ठल नगर परिसरात सोमवारी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात आला. यामुळे पवार यांनी पाणी भरण्यासाठी मोटार लावल्यानंतर मोटारीची नळी निघाली. ती पुन्हा मोटारीला लावत असतांना पवार यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात ते दूरवर फेकले गेले.

शेजार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याच परिसरात पवार यांचे भाऊ राजेंद्र पवार यांनी प्रकाश पवार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. याठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले .त्यांचे हरिविठ्ठल रिक्षा स्टॉपवर सलूनचे दुकान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शालीनी, आई, सखुबाई व मुलगा शुभम व भाऊ राजेंद्र पवार असा परिवार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com