दसनुर येथील वैशाली पाटील, ऐनपूरच्या कमलेश महाजन यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

रावेर पंचायत समिती येथे झाले वितरण, पुरस्कार्थीना प्रशस्तीपत्र व दहा हजार पारितोषिक देऊन झाला गौरव
दसनुर येथील वैशाली पाटील, ऐनपूरच्या कमलेश महाजन यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

रावेर|प्रतिनिधी Raver

ऐनपूर (Ainpur) येथील कमलेश महाजन व दसनूर (Dasnur) येथील वैशाली पाटील जिल्हा परिषदेच्या (ZP) आदर्श शेतकरी पुरस्काराने (Ideal Farmer Award) सन्मानित करण्यात आले आहे. येथील पंचायत समितीच्या सभागृहात वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या जयंतीच्यानिमित्ताने कृषी दिनाचे औचित्य साधून, आदर्श शेतकरी पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी दसनूर येथील वैशाली पाटील यांनी खपली गव्हाचे विक्रमी उत्पादन तसेच ५० एकर शेतीची मशागत करत असल्याने,त्यांच्या  कार्यांचा गौरव जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे.

याशिवाय ऐनपूर येथील कमलेश महाजन यांनी ऐनपूर येथे पहिल्यांदा हळदीचे लागवड करून,सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्याने त्यांचा देखील सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.यावेळी पुरस्कार्थीना प्रशस्तीपत्र व १० हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषीदिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने,यंदा दोन्ही वर्षाच्या पुरस्कार्थीना गौरवण्यात आले आहे.यावेळी पंचायत समिती सभापती कविता कोळी,गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल,पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी,योगिता वानखेडे व कृषी विभागाचे अधिकारी मयूर भामरे,मंडळअधिकारी ढाले, पंचायत समिती कृषी अधिकारी एल ए पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com