गौणखनिज गैरव्यहारप्रकरणी ठेकेदारांसह, दोषींवर होणार कारवाई

गौणखनिज गैरव्यहारप्रकरणी ठेकेदारांसह, दोषींवर होणार कारवाई

सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश

जळगाव | प्रतिनिधी jalgaon

जि.प.च्या सिंचन विभागांतर्गत झालेल्या कामांसाठी कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेला गौण खनिजांची रॉयल्टी Royal Minerals Royalty न भरता कामे करुन फसवणुक Fraud करणार्‍या संबंधित ठेकेदारांना To contractors काळ्या यादीत टाकून इतर दोषींवर शुक्रवारपर्यंत गुन्हे दाखल करण्याचे आदेश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया CEO Dr. Pankaj Asia यांनी बुधवार, ४ ऑगस्ट रोजी दिले आहेत

जिल्ह्यात जलयुक्तची कामे करतांना जि.प.च्या सिंचन विभागांतर्गत झालेल्या कामांसाठी कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेला गौण खनिजांची रॉयल्टी न भरता कामे केले असून त्याबाबत रॉयल्टी भरल्याच्या बनावट पावत्या सादर करून शासन आणि जिल्हा परिषदेची फसवणूक करून गैरव्यहार केल्याप्रकरणी जि.प.सदस्य पल्लवी सावकारे यांनी वारंवार जि.प.च्या सर्वसाधारण सभेत विषय मांडला.

याप्रकरणी नवनियुक्त सीईओ डॉ.पंकज आशिया CEO Dr. Pankaj Asiaयांनी संबंधित ठेकेदारांसह इतरांना दणका दिला आहे. जिल्हा परिषदेत गेल्या वर्षंभरापासून जि.प.सदस्या पल्लवी सावकारे गौण खनिजप्रकरणात झालेला गैरव्यहार विषयाबाबत पाठपुरावा करीत आहेत. त्यात वेगवेगळे पैलू उलगडत गेले. सिंचन विभागातील उपअभियंता राधेश्याम सोनवणे यांनी सादर केलेल्या खुलाशातील पावत्या महसूल विभागाने आमच्याकडून निर्गमित झाले नसल्याचे उपजिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केल्याने पावत्या बनावट असल्याचे समोर आले.

त्यानंतर बुधवारी सीईओंची जि.प.सदस्या पल्लवी सावकारे ZP member Pallavi Saavkareयांनी भेट घेऊन त्याबाबत कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर सीईओंनी तातडीने याप्रकरणी कारवाईंचे आदेश दिल्याने ठेकेदारासह संबंधित अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com