भुसावळ : नियमभंग करणार्‍या व्यावसायीकांवर कारवाई
जळगाव

भुसावळ : नियमभंग करणार्‍या व्यावसायीकांवर कारवाई

शहरात सुरू आहे लॉकडाऊन

Rajendra Patil

भुसावळ | प्रतिनिधी Bhusawal

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भुसावळ शहरात दि.७ ते १३ जुलै २०२० या कालावधीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे लॉकडाऊन घोषित केले असून या कालावधीत नियमभंग करणार्‍या व्यवसायिक व नागरिकांवर दि. १० जुलै रोजी उपविभागीय अधिकारी भुसावळ व किरण पाटील उपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ नगर पालिकेच्या पथकांनी कारवाई केली आहे.

यामध्ये दिलीप पटवारी, वेफर्स कारखाना, चाहेल ढाब्यासामोर, शेख रिजावान टायरवाले, सभा चौफुली जवळ, खान्देश फेब्रिकेशन खडका चौफुली जवळ, मानिरल इस्लाम लष्कर गॅरेजवाले वरणगाव रोड, अविनाश महेंद्र गोडसे भाजी विक्रेता म्युनिसिपल मार्क, सागर ठाकरे, भाजी विक्रेता म्युनिसिपल पार्क, प्रफुल्ल घाडगे भाजी विक्रेता, म्युनिसिपल पार्क, गब्बू गवळी, किराणा दुकान, गवळी वाडा, भारत रेडियटर जळगाव रोड, विश्वकर्मा फेब्रिकेशन जुना सातारा जळगाव रोड यांनी लॉकडाउन काळात व्यवसाय सुरु ठेवल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच भारत ट्रेडर्स, पूजा कॉम्प्लेक्स हे दुकान सील करण्यात आले असून रस्त्यावर थूंकल्याबद्दल प्रशांत अशोक साळी (रा.अमळनेर) यांना दंड करण्यात आला आहे.

या पथकात संजय बानाईत, पंकज पन्हाळे, सूरज नारखेडे, चेतन पाटील, रामदास म्हस्के, विशाल पाटील, किरण मनवाडे, अनिल मनवाडे, राजेश पाटील, स्वप्नील भोळे, गोपाल पाली, विजय राजपूत, योगेश वाणी, धनराज बाविस्कर, मयूर साई, दीपक शिंदे, पोकॉ चारुदत्त पाटील, पोकॉ किशोर पाटील यांचा समावेश आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com