जळगाव : मेहरुण तलाव ट्रॅकवर फिरणार्‍यांवर कारवाई

पोलिसांनी वसुल केला ३३०० रुपये दंड
जळगाव : मेहरुण तलाव ट्रॅकवर फिरणार्‍यांवर कारवाई

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

मेहरुण तलाव परिसरात जॉगिंग ट्रॅकवर कार व मोटारसायकल फिरवण्यास बंदी असताना सुद्धा नऊ मोटरसायकलस्वार त्या ठिकाणी फिरत असताना पोलिसांना रविवारी सकाळी ७ वाजता आढळले. त्यांच्याकडून पोलिसांनी ३३०० रुपये दंड वसुल केला.

यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मेहरुण तलावाच्या परिसरात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल विश्वजीत सोनवणे, गोविंदा पाटील, तसेच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक फौजदार प्रकाश परदेशी, हेड कॉन्स्टेबल विजय जोशी आदींनी कारवाई केली.

तलावावरील हा ट्रॅक परिसर हा फिरण्यासाठी असल्याने या ठिकाणी कार व मोटार सायकल चालवण्यात बंदी आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com