गाळे सीलची कारवाई टळली

शनिवारपर्यंत कारवाई स्थगित
गाळे सीलची कारवाई टळली

जळगाव - Jalgaon

मनपा मालकीच्या (Municipal Corporation) मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी थकबाकी न भरल्यामुळे प्रशासनातर्फ बुधवारी गाळे सीलची कारवाई केली जाणार होती. त्यासाठी (Police) पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता.

मनपाचे पथक देखील तयार होते. सकाळी मनपाचे उपायुक्त संतोष वाहुळे (Deputy Commissioner Santosh Wahule), प्रशांत पाटील यांच्यासह पथक कारवाईसाठी जुने बी. जे. मार्केट मध्ये पोहचले. मात्र येथील गाळेधारकांनी शनिवार पर्यंत अर्धी रक्कम भरण्याची हमी दिली. त्यामुळे सीलची कारवाई शनिवारपर्यंत स्थगित करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com