फुले मार्केटची चौफेर पॅकिंग
जळगाव

फुले मार्केटची चौफेर पॅकिंग

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या दोनतीन दिवसापासून सातत्याने होणारी गर्दी, फूटपाथवरील यात्रेचे स्वरुप पाहता फुले मार्केट पुन्हा चौफेर पत्रांद्वारे बंद करण्यात आले आहेे उपायुक्तांची काल सकाळपासूनच फुले मार्केटमध्ये तडकाफडकी कारवाई सुरू असून सकाळीही दोनवेळा धावपळ उडाली होती. जो तो आपापले गाठोडे घेवून जिकडे तिकडे पळत होते. फूटपाथवरील व बाहेर रस्त्यावरील अतिक्रमीत दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली. मार्केटचे दोन गेट वगळता सर्वच मार्ग, गेट बंद केलेले असल्यामुळे हॉकर्स, फूटपाथ विक्रेेतेंंसह नागरिकांचीही चांगलीच पंचाईत झाली.

नवीन आदेश निघाल्यापासून अधिकृत दुकानदार हे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे पालन करीत असल्याचे चित्रच सध्याही दिसून येत आहे. याउलट गोलाणी मार्केटमध्ये सर्वच मोबाईल दुकाने खुली केलेली होती व रोखीने व्यवहार होत असल्याचेही दिसून आले. काही दुकानदार, व्यापार्‍यांनी गैरफायदा घेत परवानगी नसतांना दुकाने उघडी ठेवली होती. शहरात नागरिकांचीही ठिकठिकाणी गर्दी झालेली निदर्शनास आली.

वाहनेही केली जप्त

फुले मार्केटमध्ये कारवाई दरम्यान मध्ये असलेले दुचाकी वाहने तसेच शहर पोलिस चौकीसमोरील गेटलगत लावलेले दुचाकी वाहने जप्त करण्यात आली तब्बल दोन ट्रॅक्टर केवळ दुचाकी वाहने जप्त केली गेली. तर एक टॅ्रक्टर विक्रेत्यांचे साहित्य, गाठोडे जप्त करण्यात आले. त्यामुळे फुले मार्केटमध्ये तास दीडतास एकदम शांतता दिसून आली.

गेट तोडल्यावरुन वाद

फुले मार्केटमध्ये आधीच्या दिवशी अतिक्रमणाच्या कारवाई दरम्यान हॉकर्स, फूटपाथ विक्रेत्यांनी एम. जी. रोडकडील शेवटचे गेट हे तोडून टाकले होते. कारण गर्दी अफाट होती. बाहेर निघायला जागा नव्हती. दरम्यान काल सकाळी उपायुक्तांनी या दरवाजाची पाहणी करीत येथे असलेल्या विक्रेत्यांना चांगलेच खडसावले व दम दिला. तसेच दाणा बाजाराकडील एक गेटही गायब होते. तसेच शहर पोलिस स्टेशनचे पीएसआय यांनाही या ठिकाणी बोलावण्यात आले. टॉवर चौकालगत अनेक व्यापार्‍यांची दुचाकी वाहने होती तीही जप्त करण्यात आली. व येथील गेटही बंद करण्यात आले.फुले मार्केटला आले यात्रेचे स्वरुप

फुले मार्केटमध्ये दोन दिवसापासून तर यात्रेचे स्वरुप होते. फूटपाथवरील व बाहेर रस्त्यावरील अतिक्रमीत दुकानदारांचा चांगला व्यवसाय झाला. अतिक्रमण पथकाने तब्बल तीन तास येथे ठाण मांडून कारवाई केल्याने व्यापारी, हॉकर्स, फुटपाथ विक्रेत्यांची चांगलीच दमछाक झाली होती. एम.जी. रोडकडून शौचालयजवळील एक गेट व दाणा बाजारकडून एक गेट असे दोनच गेट अर्धे अर्धे उघडे ठेवले आहेत. बाकी सर्व गेट बंद केले आहेत.

मार्केटमधून बाहेर जाणारे बहुतेक मार्ग बंद झाल्याने अनेक नागरिक फुले मार्केटमध्येच फिरतांना दिसत होते. गेल्या तीन दिवसापासून लॉकडाउन संपले की काय? मनपाने शिथिलता दिली की काय अशी चर्चा या परिसरात होती. मार्केटला पूर्वीसारखे यात्रेचे स्वरुप असल्याने अनेक दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com