चाळीसगावात मास्क न लावणार्‍यांवर कारवाईचा बडगा
चाळीसगावात मास्क न लावणार्‍यांवर कारवाईचा बडगा
जळगाव

मास्क न लावणार्‍यांवर कारवाईचा बडगा

१३ हजार ८०० रुपय दंड वसूल

Manohar Kandekar

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

चाळीसगाव मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे . तरी देखील लोकांना याचे गांभीर्य दिसत नाही, म्हणून चाळीसगाव नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या वतीने दि २७ पासून मास्क न लावणार्‍या लोकांवर कारवाई सुरू केली.

मास्क न लावणार्‍या ना २०० व ५०० रुपये दंड आकारणी सुरू केली असून सोमवारी दिवसभरात १३ हजार ८०० रुपय दंड वसूल करण्यात आला आहे. या पथकात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सपोनि.मयुर भामरे, पोकॉ राहुल गुंजाळ, भुषण पाटील, प्रकाश पाटील व नगरपरिषदेचे कर अधीक्षक अशोक देशमुख, वसंत देशमुख, पंकज शिंदे आदिचा समावेश होता.

Deshdoot
www.deshdoot.com