भास्कर मार्केटसह दंगलकॉलनीतील मांस विक्रीच्या दुकानदारांवर कारवाई

महापालिका, जिल्हापेठ पोलिसांकडून तपासणी, १८ हजारांचा दंड वसूल
भास्कर मार्केटसह दंगलकॉलनीतील मांस विक्रीच्या दुकानदारांवर कारवाई

जळगाव -

महावीर जयंती असतांनाही सालाबादाप्रमाणे मांस विक्रीचे दुकाने बंद न ठेवता सुरु ठेवणार्‍या शहरातील भास्कर मार्केट येथील ७ व दंगलग्रस्त कॉलनी येथील २ अशा नऊ दुकानांवर महापालिकेसह जिल्हापेठ पोलिसांनी आज रविवारी सकाळी १० वाजता संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत दुकानादाराकडून प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे एकूण १८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

प्रत्येकी २ हजार रुपये दंड

जिल्ह्यात महावीर जयंतीसह इतर धार्मिक सणांच्या दिवशी मांस विक्रीचे दुकाने बंद असतात. सालाबादाप्रमाणे यावर्षीय आज महावीर जयंती असतांना शहरातील भास्कर मार्केटसह दंगलग्रस्त कॉलनी येथे मांस विक्रीचे दुकाने सुरु असल्याचे महापालिकेच्या पथकाच्या पाहणीत लक्षात आले. त्यानुसार महापालिका तसेच जिल्हापेठ पोलिसांनी भास्कर मार्केट येथील अपना चिकन सेंटर, ए वन चिकन सेंटर, जय भवानी चिकन सेंटर, अमोल चिकन सेंटर, हसनीयन चिकन सेंटर, अलीशान चिकन सेंटर, सातपुडा चिकन सेंटर या सात दुकानांसह दंगलग्रस्त कॉलनी येथील आसी अजीज खाटीक व जाकीर असलम खाटीक अशा ९ दुकानांवर प्रत्येकी २ हजार याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली. कारवाईतून १८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या पथकाची कारवाई

महापालिकेचे आरोग्य निरिक्षक सुरेश भालेराव अतिक्रमण विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर, स्लॉटर अधिकारी संजय पवार, कर्मचारी दिपक भालेराव, मुस्तफा मुसा भिस्ती, फकीरा अडकमोल यांच्यासह जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक प्रदीप चांदेलकर, पोलीस उपनिरिक्षक श्रीराम बोसरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज पवार, तुषार जावळे, विजय सोनार, मेहबूब खान, महिला पोलीस छाया पाटील यांच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com