सिन्नर
सिन्नर
जळगाव

जन्मठेपेच्या शिक्षेतील आरोपीचा मृत्यू

२१ वर्ष जेलमध्ये भोगली सजा, कोरोनाच्या सुट्टीत घरी आल्यानतंर मृत्यू

Manohar Kandekar

चाळीसगाव - प्रतिनिधी chalisgaon

तब्बल २१ वर्षांपासून शिक्षा भोगत असलेला ३०२ च्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा झालेल कैद्याची, सजा पूर्ण होण्यास तीन वर्ष बाकी असतानाचा काल तालुक्यातील धामणगाव येथे हद्यविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मयत कैद्याचे नाव जालिंदर भिमराव सोनवणे असे आहे.

मयत जालिंदर सोनवणे याला सन १९९९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हा पासून तो धुळे कारागृहात शिक्षा भोगत होता. २१ वर्ष शिक्षा भोगल्यानतंर तो गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरी सुट्टीत आला होता. दि,१३ रोजी रात्री त्याला झोपत हद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचा झोपतच मृत्यू झाला. त्यांची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होण्यासाठी अजुन तीन वर्षबाकी असतांनाचा त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनल नानाभाऊ भिमराव सोनवणे यांच्या खबरीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com