व्यापार्‍यांची 61 लाखात फसवणूकप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

व्यापार्‍यांची 61 लाखात फसवणूकप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

जळगाव - Jalgaon :

चनाडाळचा व्यवसाय करणार्‍या जळगावच्या दोन व्यापार्‍यांची 61 लाख 76 हजारात फसवणूक करणारा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील अभिजित कापसे याला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

दरम्यान, आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी संजय नंदलाल व्यास (वय50, रा. विवेकानंद नगर, जळगाव) याचे एमआयडीसीत व्यास इंडस्ट्रिज नावाचे दालमिल कंपनी आहे तसेच त्यांचे मित्र राजेश ओंकार अग्रवाल यांचे पुष्पा पल्सेस नावाचे चनाडाळ कंपनी आहेत. दोघे चांगले मित्रही आहे.

त्यांच्या चनादाळचा व्यवसाय असल्याने अनेक ठिकाणी व्यवसायाचा व्यवहार होतात. असाच व्यवहार 6 जानेवारी 2018 मध्ये संशयित आरोपी अभिजित अरूण कापसे (वय 26, रा. ज्योतीबाची वाडी, ता. बार्शी जि. कोल्हापूर) यांच्याशी व्यवहार झाला होता.

फिर्यादी संजय व्यास यांनी 30 लाख 8 हजार आणि त्यांचे मित्र राजेश अग्रवाल यांनी 31 लाख 68 हजार रुपये किंमतीची चनादाळ दिली. व्यवहार झाल्यानंतर संशयित आरोपी अभिजित कापसे यांने दोघांना प्रत्येकी 25 लाख रूपयांचे धनादेश दिला.

मात्र बँकेत रक्कम पुरेशी नसल्याने दोन्ही धनादेश वटला नाही. तसेच उर्वरीत 11 लाख 76 हजार देणे बाकी होते. फिर्यादी संजय व्यास आणि त्यांचे मित्र राजेश अग्रवाल यांनी पैश्यांचा तगादा लावला असता पैसे दिले मिळाले नाही.

संजय व्यास यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल केला. आज पोलीसांनी संशयित आरोपी अभिजितला अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुळकर्णी यांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com