जळगाव : बालिकेवर अत्याचारप्रकरणी आरोपीस ७ दिवसांची कोठडी
जळगाव

जळगाव : बालिकेवर अत्याचारप्रकरणी आरोपीस ७ दिवसांची कोठडी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon

शहरात भीक मागणार्‍या 10 वर्षांच्या बालिकेस खाऊचे आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सुभाष चौक परिसरात एक बालिका तिच्या आत्यासोबत भीक मागत होती. सौरभ वासुदेव खर्डीकर (वय 25, रा. राधाकृष्णनगर, शिवाजीनगर) याने 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान सुभाष चौकातील भवानी माता मंदिर परिसरातील भीक मागणार्‍या मुलीला खाऊ देण्याचे आमीष दाखविले. सौरभ याने त्या बालिकेस मोटारसयाकलवर बसवून गोलाणी मार्केटमध्ये आणले होते. मार्केटच्या तिसर्‍या मजल्यावरील शौचालयात तिच्यावर अत्याचार केला.

या बालिकेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तिच्या आत्याने फिर्याद दिली. त्यावरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सीसीटीव्हीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सौरभला त्याच्या राहत्या घरी पकडले होते. रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले.

Deshdoot
www.deshdoot.com