बालिकेचे अपहरणप्रकरणी आरोपी पोलीसांच्या ताब्यात
जळगाव

बालिकेचे अपहरणप्रकरणी आरोपी पोलीसांच्या ताब्यात

एलसीबी व वरणगाव पोलीसांचे स्टेशनचे पथक यांची संयुक्तरीत्या कामगिरी

Ramsing Pardeshi

वरणगांव फॅक्टरी (वार्ताहर) - Varangaon Factory

येथून जवळच असलेल्या पाचदेवळी येथील शिवारातील अल्पवयीन मुलगी ही घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेल्याची घटना दि. ९ रोजी घडली होती. या प्रकरणी तिचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याबाबत वरणगाव पो.स्टे.ला मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरुन गु.र.नं. १२९/२० भा.दं.वि. ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी कोणताही पुरावा नसताना परिसरात गोपनिय सूत्रांकडून माहिती काढून कलेगाव (मलकापूर) येथे पीडित अपहृत मुलीबद्दल पूर्व इतिहास काढुन फिर्यादीचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून दोन दिवस एलसीबीच्या पथकासोबत यातील आरोपीचा शोध घेतला.

आरोपी पीडितासोबत बाहेर राज्यात पळून जाण्याचे तयारीत असताना आरोपी राहुल जानकीराम धूलकर (वय १९, रा. साळसींगी ता.बोदवड) यास पीडितेसोबत ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला. सदर गुन्ह्यास करंजी जवळच्या पोलीस पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट असे माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्यास मोलाचे सहकार्य केले.

गुन्हा उघडकीस आणण्यासाठी एलसीबी व वरणगाव पोलीसांचे स्टेशनचे पथक यांनी संयुक्तरीत्या कामगिरी करून उघडकीस आणला आहे. नमूद गुन्हयात आरोपिताने पीडितासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाल्याने भा.दं.वी ३७६, पोस्को का, क, ४/८ प्रमाणे कलम वाढ करून आरोपीस न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यास २१ जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वरणगावचे सपोनि संदीप कुमार बोरसे, हर्षल भोये व सहकारी यांनी इतरांच्या सहकार्याने या प्रकरणात आरोपी शोधुन काढला.

Deshdoot
www.deshdoot.com