कोळीपेठतील हद्दपार आरोपीला अटक

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान शनिपेठ पोलिसांची कारवाई
कोळीपेठतील हद्दपार आरोपीला अटक

जळगाव- Jalgaon

जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार Deportation असतांनाही जळगाव शहरातील शनिपेठ भागात बालाजी मंदिर रोडवर फिरतांना मिळून आलेल्या सागर उर्फ झंपर्‍या आनंदा सपकाळे (वय २४ रा. कोळीपेठ) या गुन्हेगाराला मंगळवारी पहाटे शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे Superintendent of Police Dr. Praveen Mundhe यांच्या आदेशानुसार शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे, पोलीस उपनिरिक्षक सुरेश सपकाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल परीस जाधव, गिरीश पाटील, राहूल घेटे, राहूल पाटील यांच्या पथकातर्फे ३० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास शनिपेठ पोलीस स्टेशन Shanipeth Police Station हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या कोम्बिंग ऑपरेशन Combing operation दरम्यान बालाजी मंदिराजवळ रोडवर सागर उर्फ झंवर्‍या हा हद्दपार आरोपी मिळून आला. त्याच्याकडे कुठलीही परवानगी नसल्याचे चौकशीत मिळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहूल घेटे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी सागर उर्फ झंवर्‍या याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com