<p><strong>भुसावळ (प्रतिनिधी)-bhusawal</strong></p><p>येथील पंचशिल नगरातील रहिवाशी पवन ऊर्फ प्रविण रविंद्र येवले (वय - २४) याच्यावर शहरातील जुने तालुका पो.स्टे जवळील भाजी मार्केट येथे आरोपी नागेश बाळु सोनवणे (वय २३ रा. पंचशिल नगर) याने पवन सोबत हुजत घालुन शिवीगाळ करुन चाकुने पोटावर मारुन गंभीर दुखापत केली होती याबाब बाजारपेघ पोलिसात गुरनं. ५१६/२०१९ भादंवि ३२६, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासुन या तब्बल १ वर्ष एक महिना १४ दिवसांपासून तो फरार होता.</p>.<p>१३ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी नरेश सोनवणे हा दि. २८ रोजी भुसावळ शहरातील पंचशिल नगर आला असल्याची गुप्त माहीती पो.नि. दिलीप भागवत यांना मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिक्षक अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पो. नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे, सपोनि मंगेश गोटाले, सहा. फौ. ग्योसोदीन शेख, कृष्णा देशमुख, तस्लीम पठाण, हे.कॉ.वाल्मीक सोनवणे पो.ना रविंद्र बिर्हाडे, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, पो.कॉ. विकास सातदिवे, सचिन चौधरी, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे, सुभाष साबळे, योगेश माळी यांनी घटनास्थळी दाखल होत अटक केली तपास हे.कॉ.वाल्मीक सोनवणे करीत आहे</p>