जिल्हयातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा

हायकोर्टाच्या निर्णयानुसार दोन संस्थांच्या निवडणुका होणार
जिल्हयातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा

जळगाव - Jalgaon :

जिल्हयात ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूकीचा आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा संपुष्टात येत आहे.

त्यातच जिल्हयातील सहकारी संस्था, जिल्हा सहकारी बँक, दूध उत्पादक संघासह विकासो, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांचा देखिल कार्यक्रम लवकरच जाहिर होणार असल्याचे संकेत आहेत.

यात हायकोर्टाच्या निर्णयानुसार राज्यात ३९ संस्थांच्या निवडणूका घेण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्हयातील दोन संस्थांचा समावेश असून रावेर तालुक्यातील सावदा आणि सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ चाळीसगाव यांचा समावेश असल्याची माहिती सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com