जळगाव पोलिसांच्या वाहनाचा मालेगावजवळ अपघात

अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी
जळगाव पोलिसांच्या वाहनाचा मालेगावजवळ अपघात

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

नाशिक येथे टपाल व वैद्यकिय बीले घेऊन जाणार्‍या जळगाव पोलीस दलाच्या वाहनाचा परत येत असताना मंगळवारी साडेतीन वाजता मालेगावजवळ अपघात झाला.

या अपघातात वाहनातील चालक सलीम शेख मुसा व बाळू आधार पाटील हे दोन कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव पोलीस दलाच्या मोटार वाहन विभागाचे सलीम शेख व मुख्यालयाचे कर्मचारी बाळू आधार पाटील असे दोघं जण पोलीस दलाची चारचाकी (क्र.एम.एच.19 ए.0741) घेऊन नाशिक येथे महानिरीक्षक कार्यालयात टपाल व वैद्यकिय बीले घेऊन गेले होते. तेथून परत येत असताना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता महामार्गावर मालेगावनजीक पुढे चालणारे कंटेनर गतिरोधकावर हळू झाले, त्याचा अंदाज न आल्यामुळे मागे चालणारे जळगाव पोलीस दलाचे वाहन कंटेनरवर धडकले.

त्यात समोरील भागाचा चुराडा झाल्याने चालक शेख व शेजारी बसलेले पाटील दोघं जण जखमी झाले. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळाल्यावर जळगाव पोलीस दलातील मोटार वाहन विभागाचे निरीक्षक समीर मोहीते हे सहकार्‍यांसह मालेगाव येथे रवाना झाले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com