जळगाव विमानतळाजवळ अपघात ; एक ठार
जळगाव

जळगाव विमानतळाजवळ अपघात ; एक ठार

औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील घटना

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

विमान तळाजवळील औरंगाबाद-जळगाव राज्य महामार्गावर बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यात एका मोटारसायकलवरील स्वार जागीच ठार झाला. तर दुसरा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्यास एमआयडीसी पोलिसांनी दवाखान्यात हलविले आहे.

सुप्रीम कॉलनीमधील प्रितेश सुरेश रायपुरे (वय ४४) हा तरुण त्याच्या मोटारसायकल (क्र.एमएच १९ एवाय ८६२६) ने विमानतळसमोरील राज्य महामार्गाने जात होता. या वेळी समोरुन वेगाने येणार्‍या मोटारसायकलने जोरदार धडक दिली. या अपघातात प्रितेश रायपुरे याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्‍या मोटारसायकलवरील विकास चंपालाल बारेला( रा.विमानतळ जवळ) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. मयत प्रितेशचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दरम्यान, मृताची ओळख पटल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात धाव घेतली. या वेळी नातेवाईकांनी आक्रोश केला.अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, इमरान सय्यद, नीलेश पाटील, मुदस्सर काजी असीम तडवी, कुसुंबा येथील पोलीसपाटील राधेश्याम पाटील आदींनी जखमीला उपचार कामी ऍम्बुलन्स न मिळाल्यानेे रिक्षामध्ये टाकून दवाखान्यात रवाना केले. तपास हेडकॉन्स्टेबल रतिलाल पवार करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com