चाळीसगाव : कन्नड घाटात अपघात नववधू ठार
जळगाव

चाळीसगाव : कन्नड घाटात अपघात नववधू ठार

देवदर्शन करून येत असताना झाला अपघात

Rajendra Patil

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावरील कन्नड घाटात दुचाकी व ट्रकच्या झालेल्या अपघातात नववधूचा जागीचा मृत्यू झाला आहे. तर पती गंभीर जखमी झाला आहे.

कालच लग्न झाल्याने देवदर्शनावरुन परत येत असलेल्या पत्नीवर काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजूनबी तालिख खान रा हुडको क्वालनी, चाळीसगाव असे मयत महिलेचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पीएसआय श्री.वाघ, पोहेकॉ.शामकांत सोनवणे, पो.ना. संदीप सपकाळे, पोना. धनराज पाटील. श्री.चव्हाण अशानी लागलीच जखमी इसमास अंबुलन्स द्वारे ग्रामीण रुग्णालयात रवाना केले स्थानिक पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती कळवून वाहतूक सुरळीत केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com