विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
जळगाव

जळगाव : फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात ; दरेकर जखमी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या सोबतच्या ताफ्यातील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला ताफ्यातीलच कॅनव्हायमधील एका वाहनाचा धक्का रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नशिराबादजवळ पाऊस सुरू असताना लागला. यात दरेकर किरकोळ जखमी झाले आहेत.

विरोधी पक्षनेते फडणवीस हे बुधवारी रात्री जळगाव जिल्ह्यात आले. माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे जावळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी फडणवीस भालोद येथे जात होते.

या वेळी त्यांच्या ताफ्यातील एका वाहनात दरेकरही होते. ते जळगावकडून भोलोदकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील कॅनव्हायमधील एका वाहनाचा धक्का दरेकर यांच्या वाहनाला लागला. यात दरेकर यांना किरकोळ मुका मार लागला आहे. हा अपघात किरकोळ होता. काही वेळाने हा ताफा भालोदकडे रवाना झाला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com