<p><strong>जळगाव : Jalgaon</strong></p><p>तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर शेती करण्यासाठी दोन लाखांची लाच मागणाऱ्या बोदवड तहसीलदारांसह सर्कल व तलाठ्यास जळगाव एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.</p>.<p>बोदवड तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तहसीलदार हेमंत पाटील, तलाठी निरज पाटील व मंडळाधिकारी संजय शिरनाथ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.</p>