पोलिसात तक्रार देवून घरी परतणार्‍या तरुणावर चाकूने वार

मासुमवाडी येथील घटना ः दहा जणांच्या टोळक्याचा हल्ला
पोलिसात तक्रार देवून घरी परतणार्‍या तरुणावर चाकूने वार

जळगाव - Jalgaon

पोलिसात तक्रार देवून घराकडे परतत असतांना पोलिसात तक्रार का दिली कारणावरुन रिहान खान फिरोज खान वय 24 या तरुणावर दहा जणांच्या टोळक्याने हल्ला चढविल्याची घटना मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास मासुमवाडी येथे घडली. मारहाणीदरम्यानर तरुणावर चाकूने वार करुन त्याला गंभीर दुखापत केली असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मासुमवाडी येथे रिहान खान फिरोज खान वय-24 हा वडील फिरोज खान, आई शमा बी, भाऊ शाहरुख खान अशांसह राहत असुन मजुरी करुन परीवाराचा उदरनिर्वाह चालवतो. 10 जून रोजी रात्री 10 वाजता रिहान हा घरी जात असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन अविनाश रामेश्वर राठोड व गण्या पूर्ण नांव माहीती नाही दोघे रा.रामेश्वर कलनी ता.जि.जळगांव व दोन अनोळखी व्यक्ती अशांनी मारहान करुन शिवागाळ,धमकी दिली होती. याप्रकरणी रिहान याने संबंधितांविरोधात एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसात तक्रार देवून घरी परतांना पुन्हा हल्ला

पोलिसात तक्रार देवून रात्री 12 वाजता घरी जात असतांना रिहानला पुन्हा मासूमवाडी येथील डायमंड हॉलजवळ अविनाश राठोड यांच्यासह काही तरुणांनी अडविले. तु पोलीस स्टेशनला आमचे विरुध्द का तक्रार दिली असे म्हणुन रिहानला चापटा बुक्कांनी मारहान करण्यास सुरवात केली. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता अविनाश रामेश्वर राठोड याने त्याचे हातातील चाकुने रिहानच्या कमरेवर वार केले. यात दुखापत तसेच रक्तस्त्राव होवुन रिहान खाली पडला. यानंतरही त्याला अविनाश सोबतच्या इतरांनी लाथा बुक्कांनी मारहान करुन शिवीगाळ केली तसेच आमचे विरुध्द तक्रार का दिली, तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. कुणीतरी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता संशयित पळून गेले.

याप्रकरणी रिहान खान याने दिलेल्या फिर्यादीवरुन अविनाश रामेश्वर राठोड, गण्या पूर्ण नांव माहीती नाही दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी, फारुख शेख अजीज रा.तांबापुरा, सचिन कैलास चौधरी रा.ईश्वर कॉलनी, वाजिद खान हमीद खान रा. मासुमवाडी, निखील मनोहर सोनार रा.सम्राट कॉलनी, शुभम भगवान माळी रा.सम्राट कॉलनी , जुनेद सादीक शेख रा.मासुमवाडी ,आकाश अजय सोनार रा.लक्ष्मी नगर या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com