तरुणाचा अग्नावंती धरणात बुडून मृत्यू
जळगाव

तरुणाचा अग्नावंती धरणात बुडून मृत्यू

अडावद येथील महेश परदेशी नगरदेवळा येथे आजी आजोबांकडे राहत होता

Rajendra Patil

नगरदेवळा, ता.पाचोरा । वार्ताहर

अडावद येथील महेश किशोर परदेशी (वय 19) हल्ली राहणार नगरदेवळा, चार पाच वर्षांपासून शिक्षणासाठी आजी आजोबांकडे राहत होता. आज दिनांक 2-8-2020 रविवार रोजी सकाळी सहा वाजता अग्नावंती धरणावर मित्रांसोबत गेला होता. पोहण्यास धरणात उतरला असता धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा सकाळी 9.30 वाजेपूर्वी बुडून मृत्यू झाला, त्यांचे प्रेत गावातील नागरिकांनी बाहेर काढले व पाचोरा रूग्णालयात शवच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील, नगरदेवळा पोलीस राजेश पाटील,विनोद पाटील, नरेंद्र विसपुते विजय महाजन करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com