हिराशिवा कॉलनीतील तरुणाचा गिरणानदीपात्रात बुुडून मृत्यू

हिराशिवा कॉलनीतील तरुणाचा गिरणानदीपात्रात बुुडून मृत्यू

निमखेडी शिवारातील घटना, रुग्णालयात मित्रांना अश्रू अनावर

जळगाव -Jalgaon

तालुक्यातील निमखेडी शिवारातील गिरणा नदी (Girna river) पात्रात शुभम उर्फ भवरलाल हिरालाल राजपूत (वय २६, रा.हिरा शिवा कॉलनी) या तरुणाचा बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता निमखेडी शिवारात घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर मोठ्या संख्येने शुभमच्या मित्रांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी अनेक मित्रांना अश्रू अनावर झाले तर कुटुंबियांनीही प्रचंड आक्रोश केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा शनिवारी मित्रांसोबत निमखेडी शिवारातील गिरणा नदीत गेलेला होता. तेथे काही लोक पाण्यात पोहत होते, शुभम याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात जायला घाबरत होता. पाण्यात उतरल्यावर खोल खड्डयाचा अंदाज न आल्याने त्यातच तो बुडाला. शेजारी पोहणारे तरुण व सोबतच्या मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने शासकीय रुग्णालयात आणले. रस्त्यात त्याचा श्वास सुरु होता. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शुभमच्या मित्रांनी रुग्णालय गाठले. यावेळी रुग्णालयात कुटुंबातील महिलांही प्रचंड आक्रोश केेला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com