जळगाव : कांताई बंधार्‍यात एक तरुण बुडाला
जळगाव

जळगाव : कांताई बंधार्‍यात एक तरुण बुडाला

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव- Jalgaon -प्रतिनिधी :

शहराजवळील कांताई बंधार्‍यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एक जण पाण्यात बुडाला असून त्याचा शोध घेणे सुरू आहे. तर दुसर्‍या मित्राने आरडाओरड केल्याने त्यास नजीकच्या इतर तरुणांनी पाण्याबाहेर काढले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

चेतन अरुण पाथरवट (वय ३१, जुना आसोदा रोड, श्रीरामनगर) व सागर पाटील (कांचननगर) हे दोघं मित्र गिरणा नदीवरील कांताई बंधार्‍यावर पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज ने आल्याने ते जास्त पाण्यात शिरले. यात चेतन पाण्यात बुडाला. त्याचा शोध धानोरा (ता.जळगाव) येथील तरुण घेत आहे

.तसेच सागर याने आरडाओरड केल्याने त्या परिसरातील काही जण मदतीला धावले. यात सागरला पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. त्यामुळे तो बचावला. या घटनेबाबत कळताच तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस कर्मचारी सतीश हळनोर, विलास पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी धानोरा येथील पोलीस पाटील पूनम सोनवणे, देवराम सोनवणे, तलाठी सारिका दुर्मळ आदींनी घटनास्थळी मदत कार्य केले.

Deshdoot
www.deshdoot.com