विवरे येथे वीज पडून महिला ठार

विवरे येथे वीज पडून महिला ठार

रावेर|प्रतिनिधी Raver

तालुक्यातील विवरे खुर्द येथील शेतीशिवारात वीज कोसळून २४ वर्षीय विवाहिता ठार झाली आहे. विवरे खुर्द शिवारातील राजेंद्र पाटील यांच्या शेतात सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वीज कोसळली, यात २६ वर्षीय शेतमजुर महिला मुरखीबाई इदा वागले हिच्या अंगावर वीज पडून ठार झाली आहे.

तर यावेळी तिची भाची रोशनी दरबार वागले (वय-९), मुलगा राहुल इदा वागले (वय-७) हे बुशद्ध पडले होते.ते जखमी आहे.यासोबत ३ वर्षीय रविना इदा वागले हिला देखील विजेचा चटका बसल्याने तिच्या हात गंभीररीत्या भाजला आहे.यावेळी मृत महिलेचा पती देखील उपस्थित होता.त्याला कोणतीही इजा झालेली नाही.

विवरे येथे वीज पडून महिला ठार
धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

Related Stories

No stories found.