<p><strong>अमळनेर - प्रतिनिधी Amalner</strong></p><p>तालुक्यातील कलाली येथील राजेंद्र चिंधा पाटील यांच्या ऊसाच्या शेतात शॉक सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत दहा लाखाचा ट्रक आणि दोन लाखाचा ऊस जळून खाक झाला आहे, राजेंद्र पाटील यांच्या शेतात ऊस तोड सुरू आहे.</p>.<p>शेतातुन गेलेल्या उच्च प्रति च्या वीज वाहिणीत शॉक सर्किट झाल्याने शेतातील ऊसाला आग लागली, ती आग ऊस भरलेल्या ट्रक (क्रमांक- एम एच ०४ जी ओ१७६४ )कडे सरकत होती, ऊसाने भरलेला ट्रक शेतातील ओलसर जागेत फसलेला असल्याने ट्रक बाहेर काढता आला नाही त्यामुळे आगीत ट्रक ने पेट घेतला त्यात दहा लाखाचा ट्रक, आणि २ लाख रुपये किमतीचा ऊस जळून खाक झाला आहे सदर ऊस हा कन्नड साखर कारखाना येथे नेला जात होता.</p>