लाकडाची वाहतूक करणारा ट्रक जप्त
जळगाव

लाकडाची वाहतूक करणारा ट्रक जप्त

परवाना नसताना शेतातून लाकूड तोड

Manohar Kandekar

चाळीसगाव - प्रतिनिधी chalisgaon

तालुक्यातील तांबोळे येथील शेतातून विनापरवाना वृक्षतोड करून मालेगाव,जि.नाशिक कडे लाकडे वाहून नेणारा मिनी ट्रक वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी खडकी बायपास जवळ काल सायंकाळी पकडला. याप्रकरणी चाळीसगाव प्रादेशिक वनविभागातर्फे ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

प्रादेशिक वनविभागाचे गस्तीवर असलेल्या कर्मचार्‍यास खडकी बायपास वर मिनी ट्रक क्र चक १८ च् ५३७८ हा मालेगाव कडे संशयितरित्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली, त्यांनी लागलीच ट्रॅक थांबवून चौकशी केली असता त्यात बाभूळ व लिंबाची लाकडे भरलेली होती, अधिक चौकशी केल्यावर सदर लाकडे ही तांबोळे येथील शेतकरी यांच्या शेतातील असून ती विना परवाना तोडून वाहतूक करून ४ घनमीटर लाकुड मालेगाव येथे नेत असल्याची माहिती ट्रक चालक मोहम्मद इब्राहिम मोहम्मद मुनीर रा.मालेगाव दिली. त्यांनी ट्रक वनविभागाच्या कार्यालयात आनून, पुढील विचारपूस केली असता, विनापरवान लाकुड वाहतुक करत असल्याची माहिती समोर आली.

याप्रकरणी चालकवर वन गुन्हा ०५/२०२० भारतीय वनअधिनियम १९४७ चे कलम ४१, २ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वनविभागाचे संजय जाधव करीत आहेत तर व्यापार्‍याचा शोध वनविभागाचे आधिकारी घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com