चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

चाळीसगाव-औरंगाबाद रोडवर रांजणगाव फाट्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी धुळे येथून औरंगाबादकडे जाणार्या एक चारचाकी गाडीतून १ लाख २६ रुपये किमतीचा ८ किलो ४०० ग्रॅम गांजा पकडला आहे.

पकडण्यात आलेल्या गांजाची तस्करी मध्यप्रदेश येथून केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली. हि कारवाई दि,१० रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची स्थापन झाल्यापासून गांजा तस्करीबाबत ही पाहिलीच कारवाई आहे. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान कालच चाळीसगाव येथे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी चाळीसगावात अवैद्य धंदे जोरात चालत असल्याचा खुलास केला होता. त्यामुळे विविध चर्चाना ऊत आला आहे.