महिनाभरापूर्वी पत्नीची तर आता पतीची आत्महत्या

कर्जाला कंटाळून संपविले जीवन ः दहा वर्षाची चिमुरडी झाली अनाथ
महिनाभरापूर्वी पत्नीची तर आता पतीची आत्महत्या

जळगाव jalgaon

शहरातील सुप्रीम कॉलनीतील Supreme Colony जुबेर मोहम्मद हनिफ खाटीक Zubair Mohammad Hanif Khatik (वय-३५) या तरुणाने गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेतल्याची घटना घडली. विशेष म्हणजे एक महिन्या अगोदरच त्याच्या पत्नीने गळफास घेतला होता. कर्जाला कंटाळून Tired of debt खाटीक दाम्पत्याने जीवन संपविल्याने नातेवाईकांडून सांगण्यात आले असून दाम्पत्याची दहा वर्षीय मुलगी मात्र पित्याचे व आईचे छत्र हरपल्याने अनाथ झाली आहे.

सुप्रीम कॉलनीतील रहिवाीस जुबेर मोहम्मद हनीफ खाटीक (वय-३५) हा तरुण रिक्षा चालवून कुटूंबीयांचा उदनिर्वाह चालवत होता. पत्नी नजमाबी या देखील बचतगटाचे काम करुन कुटूंबाला हातभार लावत होती. बचतगटाचे कर्ज आणि भिशीची उसनावारी या मुळे नजमाबी यानी गेल्या महिन्यातच स्वयंपाक घरात गळफास घेत आत्महत्त्या केली हेाती. पत्नी नजमाचा मृत्यु होवुन एक महिना लोटत नाही. तोवर, गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता जुबेर घरात एकटा असतांना त्याने वरच्या मजल्यावरील खोलीत ओढणीने गळफास घेत आत्महत्त्या केली. परिसरातील नगरसेवक सादिक खाटीक यांनी शेजार्‍यांच्या मदतीने जुबेरला खाली उतरवून तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केल. डॉ.निता पवार यांनी तपासणी करुन त्यास मृत घोषीत केले. मयत जुबेरच्या पश्चात दहा वर्षीय मुलगी नुज्जत असून महिन्याभरात चिमुरडी अनाथ झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com