मनपाच्या रुग्णालयातून बॅटरी चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बॅटरी हस्तगत
मनपाच्या रुग्णालयातून बॅटरी चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात
Crime

जळगाव - Jalgaon

शहरातील पिंप्राळा हुडको येथील महापालिकेच्या रुग्णालयाचा दरवाजात तोडून चोरट्यांनी रुग्णालयातील इर्न्व्हटरची १५ हजार रुपये किंमतीची बॅटरी लांबविल्याची घटना काल सोमवारी सकाळी ८ वाजता समोर आली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आज मंगळवारी सकाळी बॅटरी चोरणार्‍या अल्पवयीन मुलाला ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गुन्ह्यातील बॅटरी हस्तगत करण्यात आली आहे.

पिंप्राळा हुडकोतील एका अल्पवयीन मुलाने ही बॅटरी चोरुन त्याच्या घरातच ठेवली असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस हवालदार प्रदीप पाटील, सुनील दामोदरे, पोलीस नाईक विजय शामराव पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे, पंकज शिंदे यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार पथकाने आज मंगळवारी दुपारी पिंप्राळा हुडको गाठून चोरी करणार्‍या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात जप्त बॅटरी जप्त करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्यास रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com