<p><strong>जळगाव : Jalgaon</strong></p><p> ममुराबाद गावाजवळील नांद्रा फाट्याच्या रस्त्यालगत बुधवारी सकाळी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. </p>.<p>दरम्यान, स्थानिकांनी ही बाब पोलिसांना कळवितात वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुसरीकडे घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झालेली होती. तर हा बिबट्या याठिकाणी मृत झालेला नसून, त्यास मारून या भागात टाकले असल्याचा संशय वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.</p>