बोरी धरणाचा एक दरवाजा उघडला

नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
बोरी धरणाचा एक दरवाजा उघडला

जळगाव - Jalgaon

बोरी धरणाचे (Bori dam) पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8.00 वाजता बोरी धरणाचा एक दरवाजे 0.15 मीटरने उघडण्यात आला असून बोरी नदीपात्रात 451 क्युसेक्स पाणी प्रवाह सोडण्यात आला आहे.

तरी बोरी धरणाचे खालील नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून बोरी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नागरिकांनी जीवित वा वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, (Girana Department of Irrigation) गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com