आदित्य संजय लोखंडे
आदित्य संजय लोखंडे
जळगाव

भुसावळ : तरुणावर गोळीबार प्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

भुसावळ - Bhusawal

येथील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ किरकोळ कारणावरून १९ वर्षीय तरुणावर गोळीबार करून तसेच त्याला फायटरने मारहाण केल्याची घटना दि.९ रोजी रात्री साडेसात ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती.

या गोळीबारात आदित्य संजय लोखंडे (वय १९, न्यू आंबेडकर नगर, भुसावळ) हा तरुण जखमी झाला. त्याला गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. या घटनेत सुरुवातीला गोळीबार झाला किंवा नाही याबाबत संभ्रम होता. मात्र जखमीचे रात्री उशिरा सीटीस्कॅन व वैद्यकीय अहवालानंतर गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणी रात्री उशीराने जखमी फिर्यादि आदित्य संजय लोखंडे (वय १९, न्यू आंबेडकर नगर, भुसावळ) याने फिर्याद दिली की, सोनु लॉन्ड्री कहा है असे विचारले असता फिर्यादीने या आरोपींना मला काय माहीत असे बोलण्याचा राग आल्याने आरोपी चिना याने आदित्यला गुरुवारी रात्री फोन करुन त्याचे घरी बोलावले व चापटा बुक्यांनी फायटरनी मारहाण करुन आदित्य यास मोटर सायकलवर बसवुन कब्रस्तान मध्ये नेवून सर्व आरोपीतांनी संगनमताने शिवीगाळ करुन चापटाबुक्यांनी मारहाण करुन आरोपी यांनी आळीपाळीने गावठी पिस्तुलने गोळी मारुन फिर्यादीच्या गालावर डाव्या कानाच्या मागे डोक्यावर डाव्या हाताचे अंगठ्याजवळील बोटावर दुखापत करुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादिचा आयफोन कंपनीचा मोबाईल व आपाची कंपनीची मोटरसायकल हीसकावून घेतली, अशी फिर्याद दिल्यावरुन आरोपी आतिष खरात, हंसराज, गोलु उर्फ राजन खरात, चिना, सुरज, गोविंदा, कपिल कासे सर्व रा.भुसावळ (पुर्ण नाव माहीत नाही) या सात संशयीताविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ७७/२०२० व कलम भाग ५ भा.दं.वि. ३०७, ३९६, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४ आर्म ऍक्ट ३/२५, ३/२७. मुं.पो.अं.३७(१), (३)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना आरोपींनी केलेल्या गोळीबारात गोळी तरुणाच्या कानाला, डोक्याला लागली असून तरुणाच्या हातालाही दुखापत झाली आहे. गोळीबाराची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी घटनास्थळ जाऊन पाहणी केली. तपास सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com