एकमेकांकडे बघितले म्हणून तरुणावर केले विळ्याने वार

चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल
एकमेकांकडे बघितले म्हणून तरुणावर केले विळ्याने वार

जळगाव - Jalgaon

तालुक्यातील आसोदा (Asoda) येथे दुचाकीवरुन जात असतांना तरुणाने बघितल्याने त्याचा राग येवून तरुणास काठीसह विळ्याने वार करत दुखापत केल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी मारहाण करणार्‍या तरुणासह त्याच्या कुटुंबातील चार जणांविरोधात तालुका पोलिसात (police) गुन्हा दाखल झाला आहे.

आसोदा येथील कोळीवाडा येथे दिनेश जगन्नाथ साळुंखे वय ३६ हा कुटुंबासह राहतो. ७ सप्टेंबर रोजी दिनेश हा बाजारपट्ट्यातून दुचाकीने घरी जात असतांना, रोहित मधुकर सपकाळे हा त्याच्या दुचाकीवर बसला. यावेळी दिनेशने रोहितकडे बघितले, त्याचा राग आल्याने रोहितने वाद घातला. हा वाद मिटल्यानंतर रोहित घरात असतांना, दिनेश याच्यासह सौरभ सपकाळे, मधुकर शंकर सपकाळे व सौरभची आई या चार जणांनी दिनेशच्या घरात प्रवेश करुन त्यास शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केली.

यादरम्यान रोहित सपकाळे याने विळ्याने दिनेशच्या डोक्यावर वार केले. यात दिनेश जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या जबाबावरुन बुधवारी रोहित सपकाळे, सौरभ सपकाळे, मधुकर सपकाळे व सौरभची आई या चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार साहेबराव पाटील हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com