जिल्ह्यात दहावीचा 99.94 टक्के निकाल

दुपारी 1 नंतर संकेतस्थळ हँग झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक त्रस्त
जिल्ह्यात दहावीचा 99.94 टक्के निकाल

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. नाशिक विभागातंर्गत जळगाव जिल्ह्याचा 99.94 टक्के निकाल लागला आहे.

दरम्यान,निकालाची उत्सुकता असल्याने दुपारी 1 वाजतापासून शिक्षण मंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर निकाल पाहण्याचा प्रयत्न होत होता.मात्र संकेतस्थळ हँग झाल्याने बराच वेळ निकाल पाहता न आल्याने विद्यार्थ्यांसह पालकही त्रस्त झाले होते.

कोरोनाचा संक्रमण असल्याने राज्य शासनाने परीक्षा न घेता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला आहे.अशा सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार दहावीचा शुक्रवारी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात दहावीच्या 58 हजार 279 विद्यार्थी प्रविष्ठ होते.त्यापैकी 58 हजार 249 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात 33 हजार 478 मुले तर 24 हजार 771 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

जिल्ह्यात 30 विद्यार्थी नापास

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत 58 हजार 279 विद्याथ्यांपैकी 58 हजार 249 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 30 विद्यार्थी नापास झाले आहेत.त्यामुळे जळगाव जिल्ह्यात दहावीचा निकाल 99.94 टक्के लागला आहे.

निकालाची उत्सुकता अन वैताग

दहावीची निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही उत्सुकता होती. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी दिलेल्या संकेतस्थळावर पाहत होते.निकाल जाहीर होऊनही संकेतस्थळावर तो पाहता येत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही चांगलेत त्रस्त झाले होते.दरम्यान,संकेतस्थळ हँग झाले होते. शहरातील इंटरनेट कॅफेवरही विद्यार्थ्यांची आणि पालकांची गर्दी पाहायला मिळाली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com