जळगाव : मनपा कोविड केअर सेंटरमधून ८० रुग्णांची सुट्टी !
जळगाव

जळगाव : मनपा कोविड केअर सेंटरमधून ८० रुग्णांची सुट्टी !

करोनामुक्त झालेल्यांचे महापौरांनी केले अभिनंदन

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

शहरात करोना बाधित असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत असली तरी कोरोना मुक्त होणार्‍यांचे प्रमाण देखील अधिक आहे. रविवारी मनपाच्या कोविड केअर सेंटरमधून ८० रुग्ण करोना मुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली.

महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सर्व रुग्णांशी संवाद साधत पुढील महिनाभर घरीच राहण्याचा सल्ला दिला तसेच भविष्यात करोना योद्धा म्हणून इतरांना जागरूक करण्याचे आवाहन केले.

मनपाच्या कोविड केअर सेंटरमधून रविवारी शहरातील ६९ तर ग्रामीण भागातील ११ अशा ८० रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, डी.जे.शिवाचे संचालक किशोर पाटील, युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया आदी उपस्थित होते.

करोनामुक्त झालेल्या सर्वांचे महापौरांनी अभिनंदन करून भविष्यात इतरांना देखील जागरूक करण्याचे आवाहन केले. मनपा कोविड केअर सेंटरबाबत असलेल्या अडचणी व तक्रारींची देखील त्यांनी विचारणा केली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com