बोदवड - प्रतिनिधी Bodwad

बोदवड शहरात कोविडं टेस्टिंग कॅम्प घेण्यात आला होता, त्यात ७८६ लोकांची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये सुमारे ६८ जण कोरोना बाधित असल्यानचे निष्पन्न झाले. कार्यरत बोदवड कोविड सेंटर वरील ४५ रूग्णांपैकी सहा रुग्णांना उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले.

आरोग्य तपासणी कँपचे आयोजन बोदवड येथिल तहसिल कार्यालय नगरपंचायत कार्यालय आरोग्य विभाग व डाँ असोसिएशन याच्या नेतृत्वाखाली दिनांक २२-२३ दोन दिवससात करण्यात आले होते. नगरपंचायत शासकीय विश्राम ग्रुह जि प्र ऊर्दू मुलीची शाळा या ठिकाणी तिन दिवस आरोग्य तपासणी व कोविड चाचनी सुरु होती.बोदवड शहरातील सर्व फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते याना ही चाचनी बंधनकारक करण्यात आली.

सदर चाचनी निगेटिव्ह आल्यास डॉ.याच्या सहीचे प्रमाणपत्र दिले गेले. आरोग्य तपासणी चाचनी सर्वानी करुन घ्यावी असे आव्हान आरोग्य विभागातर्फे करण्यात आले होते त्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला असुन दिनांक २३-३ रोजी तिन केंद्रावर ऐकुन ७८६ लोकानी कोरोना टेस्ट केली असून त्यापैकी६७लोकाचा अहवाल पाँझिटिव आला आहे संजय सूरकर आरोग्य साहाय्यक प्रविन माळी आरोग्य सेवक अमोल पाटील संजय माळी आशा वर्कर कल्यानी माळी स्वाती माळी या शासकीय विश्रामग्रुहावर सेवा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सेवा बजावत होते