जिल्ह्यात 631 नवे बाधित रुग्ण तर 11 जणांचा मृत्यू

अ‍ॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत घट; दिवसभरात 577 रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यात 631 नवे बाधित रुग्ण तर 11 जणांचा मृत्यू

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मृत्यू होणार्‍यांची संख्येत किंचितशी घट झाल्याने प्रशासनाकडून जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 631 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच 11 जणांचा मृत्यू झाला असून 577 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यात आज 16 मे रोजी दिवसभरात 631 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 35 हजार 142 एवढी झाली आहे. तर दुसरीकडे 577 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 23 हजार 29 इतकी झाली आहे. नवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 34, जळगाव ग्रामीण 31, भुसावळ 54, अमळनेर 33, चोपडा 19, पाचोरा 52, भडगाव 0, धरणगाव 36, यावल 15, एरंडोल 23, जामनेर 145, रावेर 32, पारोळा 38, मुक्ताईनगर 9, चाळीसगाव 69, बोदवड 36 आणि इतर जिल्ह्यातील 5 असे एकूण 631 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात अकरा जणांचा मृत्यू

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून रविवारी जिल्ह्यात 11 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जळगाव शहरातील तीन, जळगाव व यावल तालुक्यातील प्रत्येकी दोन तर जामनेर, भुसावळ, मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 417 इतकी झाली आहे.

667 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 667 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com