जळगावातील प्रकल्पात ४३ टक्के जलसाठा
जळगाव

जळगावातील प्रकल्पात ४३ टक्के जलसाठा

दिलासा । तीन मोठ्या प्रकल्पांत गतवर्षी होता केवळ 13.05 टक्के जलसाठा

Rajendra Patil

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यातील हतनुर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पात आज मितीस 444.93 दलघमीसह 15.71टीएमसी म्हणजेच 43. 32 टक्के तर अन्य 96 लघु, मध्यम प्रकल्पांसह जिल्ह्यात 628. 49 दलघमीसह 22.19 टीएमसी म्हणजेच 44.03 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी या सर्व प्रकल्पात केवळ 171.91 दलघमी म्हणजेच 6.7 टीएमसी, म्हणजेच 12.05 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून नोंदविण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कमी-अधिक पावसामुळे तीन मोठ्या प्रकल्पांपैकी तापी नदीवरील हतनूर प्रकल्पात सद्यस्थितीत 41.20 दलघमी म्हणजेच 18.51 टक्के, जळगाव जिल्ह्याच्या तसेच नांदगाव व मालेगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गिरणा प्रकल्पात 210.80 दलघमी म्हणजेच 38.54 टक्के, तर वाघुर प्रकल्पात 195.93. दलघमी म्हणजेच 78.83% असे तीनही मोठ्या प्रकल्पात 444.93 दलघमी म्हणजेच 15.71 टीएमसी म्हणजेच 43.32 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

तसेच जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प पैकी मंगरूळ, अग्नावती हिवरा हे प्रकल्प 100% भरले असून बोरी प्रकल्पातून 942 क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे. तसेच जिल्ह्यातील या प्रकल्पापैकी अभोरा 80.15, सुकी 92.76, मोर 63.25, बहुळा 60.11, तोंडापूर 69.03, अंजनी 34.10, गुळ 70.83,भोकरबारी 6.33, बोरी 74.54, आणि मन्याड 29.87 असे लघु मध्यम प्रकल्पात 64.31 टक्के तर लघु, मध्यम व मोठ्या अशा 96 प्रकल्पात 628 .49 दलघमी म्हणजेच 44.03 टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

गतवर्षी या तिन्ही प्रकल्पात अनुक्रमे हतनूर 20.47, गिरणा 7.52, वाघूर 20.78% असा अत्यल्प उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. गिरणा प्रकल्पावर जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यांचा ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. या गिरणा प्रकल्पाच्यावर नाशिक जिल्ह्यात गिरणा नदीवर असलेले चणकापूर 20.42, अर्जुन सागर 45.36 टक्के या दोन प्रकल्पात उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.

चणकापूर व अर्जुन सागर हे दोन मोठे प्रकल्प भरल्यानंतरच गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक सुरू होते शिवाय प्रकल्पाच्या वर गिरणा नदीला मिळणार्‍या उपनद्यांवर हरणबारी, केळझर, नागा- साक्या तसेच मन्याड नदी वर माणिकपुंज असे विविध प्रकल्प आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com