अबब....जिल्ह्यात आढळले ५२० करोना रुग्ण
जळगाव

अबब....जिल्ह्यात आढळले ५२० करोना रुग्ण

सर्वाधिक १५४ रुग्ण आढळले जळगाव शहरात

Pankaj Pachpol

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोरोना पॉझिटीव्ह आढळुन आलेल्या रुग्णसंख्येचा सोमवारी विक्रम झाला. सोमवारी एकाच दिवसात ५२० कोरोना रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळुन आले.

आतापर्यंत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळुन आले आहे. त्यात १५२ रुग्ण एकट्या जळगाव शहरात आढळुन आले आहे.

तर जळगाव ग्रामीणमध्ये ३९, भुसावळ १७, अमळनेर ३४, चोपडा १३, पाचोरा ११, भडगाव १६, धरणगाव ०६, यावल १३, एरंडोल ४०, जामनेर ७१, रावेर ०७, पारोळा ११, चाळीसगाव ५५, मुक्ताईनगर २५, बोदवड ०३ तर पर जिल्ह्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे. ३,९४५ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com