चाळीसगावात ४० रुग्ण पॉझिटिव्ह
जळगाव

चाळीसगावात ४० रुग्ण पॉझिटिव्ह

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

चाळीसगावात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढत होत असून चाळीसगाव कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करीत आहे, काल रात्री उशिरा व आज सायंकाळपर्यंत तब्बल ४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दहा जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

शहरासह तालुक्यातील विविध भागात कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसात पाठवण्यात आलेले स्वँबचा अहवाल काल रात्री उशिरा आणि आज सायंकाळपर्यंत प्राप्त झाले. यात चाळीसगावतील चाळीस रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, दहा जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.

तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. चाळीसगावात एकाच वेळेस चाळीस रुग्ण आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

गेल्या काही दिवसांपासून चाळीसगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे चाळीसगाव कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com